Saturday, April 10, 2010

नशीब, दुसरं काय?

कधी विचार केला अाहे, असं (नाही, असंच) का होतं याबद्दल?


गृहपाठ केलेला नसेल तेव्हाच इतिहासाचे "अौरंगजेब" मास्तर वह्या तपासायला का मागतात? option ला टाकलेली गणितंच नेमकी परिक्षेत का येतात? अाणि जीवाच्या अाकांताने सर्व syllabus पूर्ण करून जय्यत तयारीनिशी सोडवलेला पेपरच नेमका कसा काय फुटतो? cutter नसतानाच पेन्सिलीचं टोक कसं बरं तुटतं? ते अख्ख्या वर्गात नेमकं परवाच भांडण झालेल्या मित्राकडेच का असतं? अभ्यासात हुष्षार अाणि घरकामात नीटनेटकी मैत्रिण सगळ जग पालथं घालून शेवटी अापल्याच शेजारच्या building मध्ये का रहायला येते? येते तर येऊ द्यात, पण नेमकी तिचीच अाई माझ्या अाईच्याच भिशी-मंडळात का दाखल होते? इतर वेळी दारात उभ्या राहूनसुद्धा फक्त वरच्या कुळकर्णी अाणि पलिकडच्या देशपांडे एवढ्यावरच गप्पा मारणा-या अाया, मग अशा casual पार्टीजमध्ये "मुलांची शैक्षणिक घोडदौड" यासारख्या माझ्या शिक्षकालाही न समजलेल्या गहन विषयावर का चर्चा करतात?


मी छत्री विसरलो तरच पाऊस का येतो? अाणि पाऊस नाहीच अाला, तर मी बसमध्ये बसलेल्या दिशेलाच सूर्यदेव हजेरी कशी काय लावतो? मी उभा असलेली रांगच नेहमी सगळ्यात हळू का बरं पुढे सरकते? कंटाळून तिकिट काढलेलं नसतानाच, इतर वेळी ढुंकुनही न बघणारा t.c. माझं अागत्यानं स्वागत का बरं करतो? प्रवासात माझ्याशेजारी नेहमी अाजीच कशा काय बसतात? अगदी लांबपल्ल्याच्या प्रवासातसुद्धा नेमकी मी बसलेली bogie bachelors' special किंवा mens only कोण घोषित करतं?


जगातल्या सगळ्या सुंदर मुली नेहमी अनोळखीच का असतात? त्यांची अोळख करुन देवू शकणारे सगळेच rational thinker का असतात? त्यांच्या मते ती "तश्या" टाईपची मुलगी का नसते? असं असूनही मग वर्गातल्या सर्वात सुंदर अशा "ती"ची, एखाद-दुसरी तुकडीच काय, पण अगदी तिन-चार मजले किंवा तितक्याच इयत्ता पार करून शेवटी सामान्यातिसामान्य अशा "त्या"च्याशी कोण अोळख करून देते? इतर वेळी फक्त तिन हात सोडून बसलेल्या, जगातल्या एकमेवाद्वितीय smart माझ्याकडे कधी एक साधा कटाक्षही टाकण्याची तसदी न घेणा-या तिला, मी जगापासून विरक्त होऊन अाणि जगाच्या अागंतुकतेच्या सगळ्या शक्यता चूकवत तिच्याच ध्यानसाधनेत मग्न असतानाच नेमकी माझ्यावर नजर टाकण्याची गरज का भासते? अाणि तशातच इतर वेळी दिड फुटावर धरलेल्या माझ्या पेपरातील वजाबाकीचं चिन्ह चष्मा लाऊनही न दिसणा-या गणिताच्या बाईंना सत्तावन्न बाकं दूरवर चाललेला अामच्यातला परस्पर-व्यवहार कसा काय अचूक दिसतो?


मी गबाळ्यासारखा रमत-गमत फिरतानाच ती रस्त्यात अाडवी का येते? इतर वेळी माग काढूनसुद्धा न सापडणा-या तिच्या पत्त्यावर नेमका अाईने दिलेली कापडी झोळी खांद्याला लटकवून डागाळलेल्या अर्धचड्डीवर अाणि bathroom चप्पल पायात असतानाच मी कसा काय जाऊन थडकतो? दुस-या खेपेला मस्त डागडूजी करून गेल्यावर मात्र ती का बरं घरात नसते? नवीन कपडे घालून जात असतानाच नेमका चिखल कसा काय उडतो? अाणि त्या रिक्षावाल्याला एक सणसणीत शिवी घालत असतानाच तीची अाई कशी काय बाल्कनीत येते?


श्रीमंत वडील, प्रेमळ अाई, समजूतदार बहिणी अाणि सुंदर बायको ह्या नेहमी मित्रांच्याच घरी का बरं सापडतात? कितीही प्रेमळ निघाली तरी नेमके अापल्याला अावडणारे पदार्थ खाण्यावरच अाईचा मज्जाव का बरं असतो? प्रसंगी 'या कानाचं त्या कानाला कळणार नाही' इतक्या सराईतपणे लाडू पळवता येणा-या माझ्या हातून डब्याचं झाकण नेमकं अाई झोपलेली असतानाच कसं काय निसटतं? पडलं तर पडलं, पण अाईची झोप मोडली नसताना, अगदी अलगत ते झाकण उचलायच्या प्रयत्नात ते परत परत पडून अावाज का बरं होतो? अाईची झोप मोडलीच नाही असं का होत नाही?


कितीही विश्वास ठेवायचा नाही ठरवलं तरी नेहमी 'सांगितलेलं भविष्य खरं ठरलेली' माणसंच मला कशी काय भेटतात? नवसाला फळ न अालेले भक्त कधीच का भेटत नाहीत? मला पोहोचायला उशिर होत असेल तेव्हाच नाटक कसं काय वेळेवर सुरु झालेलं असतं? त्यातूनही इतर वेळी सूम्म असलेला माझा फोन नेमका नाटक सुरु असतानाच कसा काय मॅडसारखा अोरडू लागतो?


का?... असच का?....

नशीब! दुसरं काय!!... बरोबर? अजिबात नाही. म्हणजे माझ्यामते तरी नाहीच! सांख्यिकी (statistics) च्या भाषेत बोलायचं झालं तर biased sampling चा इफेक्ट. पेन्सिलीचं टोक तुटण्यापासून ते ज्योतिषशास्त्राच्या यशापर्यंत, अगदी तेच! कसं ते तुम्ही शोधा. पण मी एवढंच सांगेन की, अापण काही अाठवणी किंवा गोष्टी खूप जास्त जपून ठेवतो, तर काही अापल्या लक्षातही येत नाहीत. अाणि इतर वेळी अापली "यश मिळेपर्यंत न थांबण्याची" चिकाटी कारणीभूत ठरते.


काही दिवसांपूर्वी माझी एक शाळेतली वर्गमैत्रिण भेटली होती. ती सांगत होती, "तिन मजले पार करणा-या तिला, तिन हातावरचा बाकडा अोलांडणं मात्र फार फार कठीण गेलं होतं".

5 comments:

Pritesh Taral said...

मी तुमचा लेख वाचला हे माज नशीब

अनिकेत वैद्य said...

मस्त लिहिलय.

मर्फी’ज लॉ’ज. (मर्फीचे नियम) असा १ प्रकार आहे इंग्रजी मध्ये.
असेच सगळे नियम आहेत त्याचे.


अनिकेत वैद्य.

sharayu said...

या गोंधळांची अपेक्षा केली ज़ात असल्याने तेच पदरांत पडतात. असे गोंधळ होण्याची शक्यता ज़वळज़वळ नाहीच हॆ मनाला पटवून दॆणे हाच उपाय.

AABHOGI... said...

good one...!!! :) ek draft purna hoin baher padla he tyacha nasheeb!!!

Nikhil Joshi said...

@ Aniket and Sharayu:

मला exactly उलटं वाटतं....

Murffey's law, नशीब वगेरे काही नसतं. आपण in general, unexpected किंवा surprises जास्त लवकर लक्षात घेतो:

"train CST station मधून् निघाली. झुकु झुकु झुकु झुकु... आणि दिल्ली station आलं" - असा blog लिहिला तर किती जणं तो वाचतील? पण मध्ये गोध्रा लागलं तरं? किंवा train मध्येच काही कारणाने बंदच पडली तर?

विचार करा: एखादं भाकित खोटं ठरलं तर ती ज्योतिषाची चूक, आणि तेच खरं ठरलं तर मात्र ज्योतिषशास्त्राची कमाल असं biased नाही का वागत आपण?

there is exactly opposite effect seen in some other fields... have a look at the wiki pedia article on "hindsight bias" at

http://en.wikipedia.org/wiki/Hindsight_bias